Sunday, May 5, 2024

मत वाया जात नाही...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मत वाया जात नाही...

प्रत्येकाने ज्याला कुणाला मत दिले,
तो प्रत्येकजणच निवडून येत नाही.
तरीही याची मात्र खात्री बाळगा,
कुणाचेच मत वायाला जात नाही.

जसे मतदान केल्याने कधीच,
कुणाचेच मत वाया गेलेले नाही.
तसे प्रत्येक मतदाराचे मतही,
प्रत्येक वेळी कामी आलेले नाही.

याचे त्याचे मत वाया गेले,
याची खंत आणि अपप्रचार नको !
मतदार वाया गेली की कामी आले?
असला व्यावहारिक विचार नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8553
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5मे2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका18मे2024....वर्ष- तिसरे..अंक -345 वा

दैनिक वात्रटिका 18मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -345 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1a_kFHzM_DDi_y5xNUbBihWvM...