Friday, May 3, 2024

मळकट आणि जळकट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मळकट आणि जळकट

उमेदवारांचे हात बळकट करा,
मळकट हात ओरडायला लागले.
उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा,
कळकट हात ओरडायला लागले.

मळकट आणि कळकट हातांची,
आज जळकट अशी एकी आहे.
त्यांची त्यांनाच पक्की खात्री आहे,
आपली सगळी फेकाफेकी आहे.

मळकट आणि कळकटांकडून,
आज विजयाच्या ललकाऱ्या आहेत !
जळकटांना जळकट म्हणायच्याही,
आजकाल चोऱ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8551
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3मे2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 285 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 14मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 285 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1HWqvXw5I3T5tgNYcFUDpa...