Friday, May 24, 2024

निवडणूक खर्च..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

निवडणूक खर्च

कायद्याच्या हातानेच,
कायद्याला पाणी पाजले जाते.
निवडणूक खर्च मोजताना,
हातचे राखून मोजले जाते.

लाखांमध्ये खर्चलेले,
शेकड्यामध्ये मोजले जातात.
खर्चाच्या रकान्याचे,
तीन तेरा वाजले जातात.

अमाप पैसा खर्चूनसुद्धा,
खर्च मर्यादा पाळली जाते !
मतदारांना वाटलेली रक्कम,
मोजायची मात्र टाळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8571
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24मे2024
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...