Thursday, May 16, 2024

खेळ खंडोबा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

खेळ खंडोबा

एखादी निवडणूक झाली की,
तिचे साईड इफेक्ट्स होत राहतात.
अत्यंत क्रूर असे धडे,
निवडणुका आपल्याला देत राहतात.

जातीविरुद्ध जात;धर्मविरुद्ध धर्म,
सगळेच्या सगळे पेटून उठू लागतात.
कालचे सोज्वळ राजकारणी,
अचानक व्हीलन वाटू लागतात.

बळी तो कान पिळी,
याचाही प्रत्यय नेहमी येत राहतो !
मतदानाच्या नंतर लोकशाहीचा,
नवा खेळ खंडोबा होत राहतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8563
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16मे2024
 

No comments:

daily vatratika...18octo2024