Tuesday, May 7, 2024

पॉलिटिकल सेटिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
पॉलिटिकल सेटिंग
आपले ते समाजकारण,
दुसऱ्याचा तो जातीयवाद असतो.
आपले तेच खरे करण्याचा,
राजकारण्यांना नाद असतो.
जातीविरुद्ध जात;धर्मविरुद्ध धर्म,
बेमालूमपणे पेटवले जातात.
जातकारण आणि धर्मकारणाचे,
राजकीय फायदे उठवले जातात.
कधी कधी जातकारणाला,
समाजकारणाचे कोटींग असते !
दुसऱ्याचा तो अपप्रचार,
आपली मात्र सेटिंग असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8555
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7मे2024

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...