Saturday, May 4, 2024

अतृप्त आत्मे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अतृप्त आत्मे

विधानसभेचे अतृप्त आत्मे,
लोकसभेत जागे होऊ लागले.
जमेल त्या झाडाला,
जमेल तसे झटे देऊ लागले.

सगळ्यात अतृप्त आत्म्यांनी,
पक्षच शिल्लक ठेवले नाहीत.
अजून तरी अतृप्त आत्म्यांच्या,
पिंडाला कावळे शिवले नाहीत.

सगळ्यात अतृप्त आत्म्यांना,
भटका-भटकी सोसावी लागते !
अतृप्त आत्मे दिसायला,
कावळ्यांची नजर असावी लागते !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 285 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 14मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 285 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1HWqvXw5I3T5tgNYcFUDpa...