Wednesday, May 8, 2024

घरोघरी मातीच्या चुली...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घरोघरी मातीच्या चुली

कारण ती माझी आई आहे,
कारण तो माझा बाप आहे.
आशा फिल्मी डायलॉगचा,
राजकारणालाच ताप आहे.

जसा गोंधळलेला पुतण्या,
तसा गोंधळलेला काका आहे.
काकांच्या राजकारणाला,
आज पुतण्यांचा धोका आहे.

नणंद असो वा भावजय,
राजकारण्यांच्याच मुली आहेत !
राजकारण्यांच्या घरोघरी,
सर्वत्र मातीच्याच चुली आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8556
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8मे2024
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...