Wednesday, May 15, 2024

चोर मचाए शोर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चोर मचाए शोर

जेव्हा जेव्हा आपल्याला,
धक्क्यावरती धक्के बसतात.
तेव्हा कोणत्याही चोरांच्या वाटा,
चोरांनाच पक्क्या माहीत असतात.

जशा वाटा माहीत असतात,
आहेत आणि असतीलही
सावांच्या मूर्खपणावरती,
तेव्हा सर्व चोर हसतीलही.

टोळीची फाटाफूट झाली की,
स्वतःला साव सिद्ध करू लागतात !
सावपणाचा आव आणीत,
चोरच चोरांवर झुरू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8562
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15मे2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 17मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 288 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 17मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 288 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1JOJavTrAtTCz0FrHea...