Thursday, May 9, 2024

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फूट आणि विलीनीकरण

फुटीनंतर विलीनीकरण असते,
विलीनीकरणानंतर फूट असते.
तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
सगळ्यांचीच काथ्याकुट असते.

फुटीला आणि विलीनीकरणाला,
एकमेकांशिवाय काहीच अर्थ नाही.
एकही राजकीय कृती अशी नसते
जिच्यामध्ये राजकीय स्वार्थ नाही.

फुटीचे आणि विलीनीकरणाचे,
जसे आनंद तेवढेच त्रास आहेत !
फुटीचे आणि विलीनीकारणाचेही,
इतिहासावर इतिहास आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8557
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9मे2024
 

No comments:

आचारसंहिता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- आचारसंहिता निवडणूक आचारसंहिता, जणू फक्त सांगण्यासाठी असते. निवडणूक आचारसंहिता, जणू फक्त भंगण्यासाठ...