आजची वात्रटिका
----------------------------
आरोपांची ढेंडाळी
कुणी ओढतोय नाडी,
कुणाचा कासोट्याला हात आहे.
निर्लज आणि नीचपणासाठी,
त्यांची एकमेकांवर मात आहे.
जेवढे ते मातू लागतात,
तेवढे एकमेकावर उतू लागतात.
स्वतःवरती वेळ आली की,
मग मात्र जोरात कुथू लागतात.
जे इतरांसाठी पेरले त्याची,
आपल्याकडेच उगवण असते!
ढेंडाळ्यावर ढेंडाळ्या लगाव्यात,
अशी आरोपांची हागवण असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6630
दैनिक पुण्यनगरी
10नोव्हेंबर2022
No comments:
Post a Comment