Thursday, November 17, 2022

आव ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आव

विस्कटलेली घडी,
आपल्यामुळे बसल्यासारखे वाटते.
काही लुंग्या सुंग्याना,
किंगमेकर असल्यासारखे वाटते.

किंगमेकर आणि गॉडफादरची,
भूमिका लुंगे सुंगे वठवू लागतात!
गाडीखालच्या कुत्र्यांचे,
आशावेळी पराक्रम आठवू लागतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-8099
दैनिक झुंजार नेता
17नोव्हेंबर2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...