Wednesday, November 30, 2022

'तळी' राम उचले... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

'तळी' राम उचले

कुणाचीही तळी उचलणारे,
लोक रोज भेटतात मला.
येळकोट येळकोट करीत,
लोक रोज गाठतात मला.

ते नेमके तिकडेच जातात,
जिकडे कुठे गुळ खोबरे आहे.
त्यांची असते एकच शोधाशोध,
आपल्यापेक्षा कोण चाभरे आहे?

उधळलेला भंडारा विचारतो तो,
नेमके कुणाचे सांग भले आहे?
उचला-उचली करणाऱ्या,
तळीरामांचेच आज चांगभले आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6648
दैनिक पुण्यनगरी
30नोव्हेंबर2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...