Wednesday, November 23, 2022

चिन्हांकित निवडणूक.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

चिन्हांकित निवडणूक

झाकली मूठ सव्वा लाखाची,
यातच आपले हित आहे.
म्हणूनच आपली निवडणूक,
शब्दशः चिन्हांकित आहे.

चिन्हांचा श्लेष काढून, काढून,
निवडणुका लढवल्या जातात.
चिन्हांकित तत्त्वज्ञान मांडून,
सोयीच्या गोष्टी पढवल्या जातात.

निरक्षरांच्या नावाखाली,
साक्षर मतदारांचीही सोय आहे !
चिन्हांभोवती फिरते लोकशाही,
आयोगालाही चिन्ह देय आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6642
दैनिक पुण्यनगरी
23नोव्हेंबर2022

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...