Saturday, November 5, 2022

पार्सल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पार्सल

अगदी पोरासोरांनाही माहिती आहे,
कोण कुठून आलेले पार्सल आहे?
तरीही प्रत्येकच पार्सलची,
निष्ठादर्शनाची जोरात रिहर्सल आहे.

जसे पार्सल हाताळले जाते,
तसे पार्सल लाथाळले जात असते.
आपली रिहर्सल रंगली की,
पार्सल जास्तच माताळते जात असते.

पार्सलच्या निष्ठा दर्शनाचे,
फक्त पार्सलला धक्के बसत नाहीत!
कितीही साफसफाई केली तरी,
पार्सलवरचे शिक्के पुसत नाहीत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6625
दैनिक पुण्यनगरी
5नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...