Friday, November 4, 2022

टिकली आणि टीका....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

टिकली आणि टीका

पिकलेल्या आंब्यामुळे,
आधीच टेर शेकली आहे.
त्यातच पुन्हा नव्याने वादात,
कुंकू अन् टिकली आहे.

कुणी कुरवाळतो दाढी,
कुणाचा मिशीला पीळ आहे.
गुरुजींच्या समर्थनार्थ,
शिष्यांची जोरदार शीळ आहे.

गुरुजींचे शिष्यांना,
संस्कृती रक्षणाचे धडे आहेत!
अधून मधून वळवळतात,
ते सांस्कृतिक किडे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6624
दैनिक पुण्यनगरी
4नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...