Friday, November 25, 2022

हात बघणार..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

हात बघणार.....

आपले भविष्य,
फक्त आपल्या हाती आहे.
हे समजले नाही तर,
पुरोगामीत्वाची माती आहे.

हात दाखवा,भविष्य बघा,
हे हात दाखवून अवलक्षण आहे.
आपल्या अंधश्रद्धेचे,
आपल्याकडूनच औक्षण आहे.

बघायचे त्याला खुशाल बघा,
इथे कुणाला मना आहे !
भविष्याच्या उत्सुकतेपोटी,
वर्तमानाची विटंबना आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6644
दैनिक पुण्यनगरी
25नोव्हेंबर2022

 

No comments:

नवस फेड ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- नवस फेड नवस फेडणे हा प्रकार, तसा खूप मजेदार असतो. भक्ताचा देवासोबत, रोखठोक व्यवहार असतो. तू अमुक दे,म...