Friday, November 25, 2022

नकली टस्सल .. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

नकली टस्सल

शंभर नंबरी नकलीच,
असली म्हणून फिरू लागले.
मोठा गाजावाजा करीत,
असली बाजूला सारू लागले.

शंभर नंबरी नकली तरीही,
त्यांची अस्सलतेशी टस्सल आहे !
अस्सल अस्सल असूनही,
बदनाम मात्र अस्सल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8106
दैनिक झुंजार नेता
25नोव्हेंबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...