आजची वात्रटिका
---------------------
लाचारनामा
हे म्हणतात, ते लाचार आहेत,
ते म्हणतात,हे लाचार आहेत.
तिकडून आणि इकडूनही,
अगदी सारखेच प्रचार आहेत.
दोन्हीकडच्याही प्रचाराची,
अगदी एकसारखीच मौज आहे.
जे करती आरोपांची चिखलफेक,
ती तर लाचारांचीच फौज आहे.
लाचारांना लाचार म्हणण्याएवढी,
जनता तरी कुठे विचारी आहे?
लोकांची ठरलेली पसंती,
ज्यांची कुणाची कमी लाचारी आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6643
दैनिक पुण्यनगरी
24नोव्हेंबर2022
No comments:
Post a Comment