Tuesday, November 1, 2022

राजमान्यता.... मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
----------------------------
राजमान्यता
हाही दगाबाज आहे,
तोही दगाबाज आहे.
आपल्या दगाबाजीचा,
ज्याला त्याला माज आहे.
जरी हा अविचार आहे,
जरी ही विवेकशून्यता आहे!
गद्दारी आणि दगाबाजी,
यांना राजमान्यता आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8084
दैनिक झुंजार नेता
1 नोव्हेंबर2022

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...