Wednesday, November 9, 2022

सत्तार्थ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सत्तार्थ

कुणी सत्तेवर स्वार होतात,
कुणावर सत्ता स्वार होते.
ज्याला सत्ता झेपत नाही,
त्यालाच सत्ता भार होते.

एकदा सत्ता स्वार झाली की,
सत्ता वाटेल ते बरळू लागते!
आपल्याबरोबर इतरांच्याही,
डोळ्यात धुळ धूरळू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8091
दैनिक झुंजार नेता
9नोव्हेंबर2022

 

No comments:

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- युद्ध प्रसंग पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था, इंधन भरू किंवा मरू आहे. इंधन टंचाईमुळे खात्री झाली, आखा...