Friday, November 11, 2022

हृदय परिवर्तन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

हृदय परिवर्तन

तुरुंगात जाताना एक असतो,
बाहेर आला की एक असतो.
बाहेर आलेला की आत गेलेला?
सांगा कोणता माणूस नेक असतो?

बदलेल्या भूमिका बघून,
आपला उगीचच त्रागा आहे !
किमान एवढे तरी मान्य करू,
तुरुंग हृदय परिवर्तनाची जागा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6631
दैनिक पुण्यनगरी
11नोव्हेंबर2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...