Friday, November 11, 2022

आचारसंहिता.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आचारसंहिता

दिल्ली असो की गल्ली,
आचारसंहिता म्हणजे
आचारसंहिता असते.
गाढवापुढे वाचलेली,
गोंधळ कम गीता असते.

कुणासाठी आचारसंहितेचा बार,
एकदमच फुसका असतो!
तुमच्या आमच्या सारख्याला,
आचारसंहितेचा धसका असतो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8093
दैनिक झुंजार नेता
11नोव्हेंबर2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...