Wednesday, November 2, 2022

नकट्याचा घोळ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नकट्याचा घोळ

नकट्यांच्या भांडणात,
नकटे नाक खुपसू लागले.
एकमेकांच्या नाकाची,
नकटे उंची चापसू लागले.

कुणी नाक घासू लागले,
कुणी नाक तासू लागले !
एकमेकांचे नाक बघून,
नकटे आ वासू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8085
दैनिक झुंजार नेता
2 नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...