Saturday, November 26, 2022

नवस फेड ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

नवस फेड

नवस फेडणे हा प्रकार,
तसा खूप मजेदार असतो.
भक्ताचा देवासोबत,
रोखठोक व्यवहार असतो.

तू अमुक दे,मी तमुक देईल,
अशी नवसाची फेड असते.
देव पावला नाही तरी,
भक्ताला नवसाचे वेड असते.

आपापल्या स्वार्थामध्ये,
देव असा ओढला जातो !
आपली बुद्धी गहाण ठेवून,
आपला नवस फेडला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8107
दैनिक झुंजार नेता
26नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...