Wednesday, November 9, 2022

मध्यावधी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मध्यावधी

सगळीकडच्या गोष्टी,
खालीवर व्हायला लागल्या.
मध्यावधीच्या चर्चा,
कानावर यायला लागल्या.

कुणासाठी सुखदा धक्का,
कुणासाठी दुःखद दणका आहे !
पुन्हा निवडून येतो की नाही?
याची खूप जणांना शंका आहे.

कुणाला वाटतात अफवा,
कुणाला वाटतो बागुलबुवा आहे!
मध्यावधी टळली जावी,
कुणा कुणाची मनोगत दुवा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6628
दैनिक पुण्यनगरी
8नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -321 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1L7d09rSTvZKajObapVCl...