आजची वात्रटिका
-----------------------
भारतीय संविधान
सगळ्याच विषमतेचा,
त्याच्यासमोर खात्मा आहे.
म्हणूनच भारतीय संविधान,
आपल्या देशाचा आत्मा आहे.
न्याय,समता,स्वातंत्र्याचा,
संविधान म्हणजे वायदा आहे.
गैरफायदा घेणारांसाठी,
संविधान म्हणजे कायदा आहे.
जसे संविधान पुजले पाहिजे,
तसे संविधान भजले पाहिजे.
जिथे संविधान रुजले नाही,
तिथे संविधान रुजले पाहिजे.
संविधान जागृतीची,
खूप मोठी गरज आज आहे!!
भारतीय संविधान म्हणजे,
सर्व ग्रंथांचा ग्रंथराज आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6645
दैनिक पुण्यनगरी
26नोव्हेंबर2022
No comments:
Post a Comment