Sunday, November 27, 2022

संशयाचे किडे.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

संशयाचे किडे

जेंव्हा एखादा संशयाचा किडा,
एकदा मनात घर करू लागतो.
त्याचे वळवळणे वाढले की,
आणखीच जोरात शिरू लागतो.

म्हणूनच असे संशयाचे किडे,
जाणीवपूर्वक सोडले जातात !
गुंतागुंत वाढून जाळे बनले की,
त्यात कानकच्चे पडले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8107
दैनिक झुंजार नेता
27नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...