Monday, November 21, 2022

कर्तबगारी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

कर्तबगारी

आपल्या पिकलेल्या केसावर,
म्हातारे कोतारे पोतारे फिरवू लागले.
आपले सगळे अचाट ज्ञान,
जावईशोध म्हणून मिरवू लागले.

साठी बुद्धी नाठी,
याच्यावरती शिक्कामोर्तब आहे !
उचलली जीभ लावली टाळ्याला,
एवढेच म्हाताऱ्यांचे कर्तब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8102
दैनिक झुंजार नेता
21नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...