Wednesday, November 23, 2022

निर्णय रद्दी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

निर्णय रद्दी

सरकार बदलले जाणे,
हा एक रपटा असतो.
जुने निर्णय रद्द करण्याचा,
नव्याकडून सपाटा असतो.

अबक,दुबक,तिबक,
यात नव्याची नवलाई असते!
विरोधाला विरोध करणे,
हीच रद्दची मावलाई असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8103
दैनिक झुंजार नेता
22नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...