Wednesday, November 9, 2022

इतिहासाची चित्तरकथा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

इतिहासाची चित्तरकथा

ज्याला जसा हवा आहे,
तसा इतिहास भादरतो आहे.
आपली हजामत बघून,
प्रत्यक्ष इतिहास हादरतो आहे.

कुणासाठी इतिहास म्हणजे,
सगळे कसे जिंदा आहे.
कुणासाठी इतिहास म्हणजे,
गल्लाभरू धंदा आहे.

कुणाचा इतिहास म्हणजे तमाशा,
कुणाचा इतिहास नाटकी आहे !
ज्याला काड्या करायची सवय,
त्याचा इतिहास काटकी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6629
दैनिक पुण्यनगरी
9नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...