Tuesday, November 15, 2022

रुसवे फुगवे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------

रुसवे फुगवे

जसे मतदार राजापुढे,
मतदानासाठी जोगवे असतात.
राजकारणात त्याहून जास्त,
राजकीय रुसवे फुगवे असतात.

राजकीय रुसवे फुगवे,
जसे जास्तच वाढू लागतात.
तसे ज्यांना आपले म्हणावे,
तेच आपल्या विरुद्ध लढू लागतात.

जसा रुसवा धरला जातो,
तसा रुसवाही काढला जातो !
रुसवा जास्त फुगला की,
रुसवा भल्याभल्यांना नडला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6631
दैनिक पुण्यनगरी
13नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...