Tuesday, November 22, 2022

बेजबाबदार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बेजबाबदार

आधी बोलून मोकळे व्हायचे,
विचार करणे नंतर असते.
जबाबदारी आणि बेजबाबदारी,
याच्यात हेच नेमके अंतर असते.

जेंव्हा जबाबदार लोकच,
बेजबाबदारीने वागू लागतात !
तेंव्हा नक्की फजितवाडा होतो,
समर्थक परिणाम भोगू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6641
दैनिक पुण्यनगरी
22नोव्हेंबर2022

 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...