Tuesday, November 1, 2022

मॉडिफिकेशन.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मॉडिफिकेशन

खो रे खोक्याचा झाला आहे,
डो रे डोक्याचा झाला आहे.
धो रे धोक्याचा झाला आहे,
मो रे मोक्याचा झाला आहे.

राजकीय कुरघोड्यांचा,
बघा परिणाम काय होत आहे?
पोरासोरांची बाराखडीही,
भलतीच मॉडीफाय होत आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6621
दैनिक पुण्यनगरी
1 नोव्हेंबर2022

 

No comments:

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- युद्ध प्रसंग पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था, इंधन भरू किंवा मरू आहे. इंधन टंचाईमुळे खात्री झाली, आखा...