Tuesday, November 22, 2022

बदलती संज्ञा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

बदलती संज्ञा

जुनीच समीकरणे,
पुन्हा नव्याने जुळू लागली
अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे,
आपोआप मिळू लागली

असेच का?तसेच का?
हे विचारायलाही संधी नाही.
काल जी डोळ्यावर होती,
आज तीही धुंदी नाही.

ज्याची त्याची मजबूरी,
हीच पडत्या फळाची आज्ञा आहे !
बदलत्या राजकारणाची,
हीच तर बदलती संज्ञा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8103
दैनिक झुंजार नेता
22नोव्हेंबर2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...