Wednesday, November 16, 2022

सूडबुद्धी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सूडबुद्धी

आजकालचे राजकारण,
ना चवाचे,ना धवाचे आहे.
निष्ठा,तत्त्व आणि विश्वास,
हे फक्त नावाचे आहे.

राजकीय सूडाने,
जो तो पेटलेला आहे
परस्परांच्या जीवावर,
जो तो उठलेला आहे.

दिवसा दिवसाला,
त्यामध्ये वृद्धी आहे!
जोरात फोपावलेली
राजकीय सूटबुद्धी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8098
दैनिक झुंजार नेता
16नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...