Tuesday, November 15, 2022

होरपळ .. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

होरपळ

वैयक्तिक आयुष्यावरती,
राजकारणात हल्ले आहेत.
उंटांवरच्या शहाण्यांचे,
जरा अगाऊच सल्ले आहेत.

ओल्या जखमांवरती,
पुन्हा पुन्हा मीठ चोळले जाते.
वैयक्तिक आयुष्य मग,
राजकारणात होरपळले जाते.

राजकारणातून वैयक्तिक आयुष्य,
जरी वगळणे मुळीच शक्य नाही !
तरी आवरू शकता;सावरू शकता,
हे काही टाळीचे वाक्य नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6632
दैनिक पुण्यनगरी
14नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...