Wednesday, November 16, 2022

प्रोत्साहन ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

प्रोत्साहन

कातडे पांघरलेल्या वाघांची
आजकाल जास्तच चलती आहे.
शेळ्यांचे कळप वाढत चाललेले,
मग त्यांची काय गलती आहे?

वाघांनी पांघरले कातडे,
इतरांचे कातडीबचाऊ धोरण आहे!
एकाचे पाहून दुसऱ्यांना,
वाघोबा बनण्याचे स्फुरण आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6634
दैनिक पुण्यनगरी
16नोव्हेंबर2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...