Saturday, November 12, 2022

रानगोष्टी.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

रानगोष्टी

सरड्याची मोठी धाव बघून,
कुंपणसुद्धा थक्क आहे.
आजकाल शेता -शेतावरती,
बुजगावण्यांचाच हक्क आहे.

रान मोकळे दिसल्यानेच,
बुजगावण्यांचे साधलेले आहे !
राना रानातल्या बांधांना,
कोरा - कोरीने बाधलेले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6632
दैनिक पुण्यनगरी
12नोव्हेंबर2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...