Friday, November 18, 2022

वादग्रस्त... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

वादग्रस्त

गोंडा घोळता घोळता,
भुंक म्हटले की भुंकले जाते.
परिणाम माहित असतानाही,
थेट सूर्यावरती थुंकले जाते.

भूंकले आणि थुंकले की,
जोरदार खटके उडले जातात!
स्वतःच्याच अंगावरती,
वादाचे शिंतोडे उडले जातात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6636
दैनिक पुण्यनगरी
18नोव्हेंबर2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...