Saturday, November 5, 2022

वेदनादायक भीती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

वेदनादायक भीती

कालचे चळवळे लोक,
आज हातपाय गाळू लागले.
ज्यांचा संघर्षाचा पिंड,
तेच आज संघर्ष टाळू लागले.

त्यांचे हातपाय गाळणे,
त्यांनासुद्धा शोभत नाही.
पण राजकीय तडजोडीशिवाय,
आज काहीच निभत नाही.

ही शरणागती नसेलही,
पण आत्मघाती निती आहे!
सामाजिक चळवळी संपण्याची,
आम्हांला वेदनादायी भीती आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8088
दैनिक झुंजार नेता
5नोव्हेंबर2022

 

No comments:

इतिहासाचे सादरीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा, इतिहास दामटला जातो. ऐतिहासिक दामटादमटीत, इतिहास चेमटला जातो. ज...