Wednesday, March 24, 2021

कोटीवर कोटी

आजची वात्रटिका
------------------------

कोटीवर कोटी

जसा कुणी वादी आहे,
तसा कुणी प्रतिवादी आहे.
सध्याचा संघर्ष,
खाकी विरुद्ध खादी आहे.

जगा आणि जगू द्या,
उगीच आपली लामण आहे !
खाकी आणि खादीत
नेमका 'खा' कॉमन आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6097
दैनिक पुण्यनगरी
24मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...