Tuesday, March 16, 2021

पुढे चला

आजची वात्रटिका
------------------

पुढे चला

पायाशी बसू देण्याचे
फेडतात पांग येथे.
मिटता गरज त्यांची,
मारतात टांग येथे.

पुढच्यास ठेच बसली,
मागचा कुठे शहाणा होता?
त्यांची कालची नम्रता,
हा तर बहाणा होता.

वाटले अडसर तरी,
त्यांच्या नादी लागू नका !
जशास तसे काही,
चुकूनही वागू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6089
दैनिक पुण्यनगरी
16मार्च2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...