Monday, March 22, 2021

निष्ठादर्शनाचा राडा

आजची वात्रटिका
------------------------

निष्ठादर्शनाचा राडा

त्यालाच हे समजू शकते,
ज्याचा अभ्यास गाढा आहे.
निष्ठादर्शनाची पहिली चॉईस,
हल्ली राडा एके राडा आहे.

राड्यावरून निष्ठा सिद्ध व्हावी,
याचेच मनापासून शल्य आहे !
उपयोग्यतेपेक्षा उपयोगाचे,
राडेबहाद्दरांचे उपद्रवमूल्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7553
दैनिक झुंजार नेता
22मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...