Saturday, March 13, 2021

'राज'कीय भूमिका

आजची वात्रटिका
---------------------
'राज'कीय भूमिका
मास्क नाही घातल्यामुळे,
नक्की टीका व्हावी.
दंड व्हायचा तो होईल,
पण तीही
'राज'कीय भूमिका व्हावी?
'राज'कीय भूमिका,
हीच खरी गंमत आहे !
सैनिकांचे माहिती नाही,
पण सेनापतीत हिंमत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6086
दैनिक पुण्यनगरी
13मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...