Saturday, March 20, 2021

गैरसमजांची बाधा

आजची वात्रटिका
------------------

गैरसमजांची बाधा

जगायचे की मरायचे?
सवाल सरळ आणि साधा आहे.क
तरीसुद्धा कोरोनाच्या लसीला,
अनेक गैरसमजांची बाधा आहे.

लसीमुळे कोरोना होणारच नाही,
याची अजून तरी कुठे गॅरंटी आहे?
पण लस नाकारणारी मानसिकता,
नक्कीच कपाळकरंटी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7552
दैनिक झुंजार नेता
20मार्च2021

 


No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...