Saturday, March 27, 2021

दुहेरी बाधा

आजची वात्रटिका
------------------------

दुहेरी बाधा

जशी राजकारणाला कोरोनाची,
तशी कोरोनालाही
राजकारणाची बाधा आहे.
संसर्गाचा वेगही,
पहिल्यापेक्षा जादा आहे.

ज्याला जसे साधता येईल,
तसे राजकारण साधीत आहेत!
राजकारण आणि कोरोना,
दोघेही परस्परांनी बाधित आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6100
दैनिक पुण्यनगरी
27मार्च2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...