Monday, March 8, 2021

वार्षिक धोरण

आजची वात्रटिका
----------------------

वार्षिक धोरण

बायकोच्या खुर्चीवर,
सर्वत्र नवरा बसतो आहे.
जागतिक महिला दिन,
अगतिकतेने हसतो आहे.

तरी बरे तीला तरी,
महिला दिनाचे स्मरण आहे !
त्यांना विचारून सांगते,
हेच तिचे वार्षिक धोरण आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7541
दैनिक झुंजार नेता
8मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...