Wednesday, March 10, 2021

आत्महत्या इच्छुकांनो...

आजची वात्रटिका
----------------------
आत्महत्या इच्छुकांनो...
आत्महत्यांचे राजकारण बघून,
तेवढी डेअरींग तरी करू नका.
काय करायचे ते करा;
पण चुकीची वाट धरू नका.
आमचा हा फुकटचा सल्ला,
कुणा-कुणाला खटकू शकतो !
आत्मा-बित्मा मानत असाल तर,
तो अधी-मधीच भटकू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
चिमटा-6083
दैनिक पुण्यनगरी
10मार्च2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...