Wednesday, March 3, 2021

खूण-गाठ

आजची वात्रटिका
----------------------
खूण-गाठ
कार्यकर्ते एकनिष्ठ असावेत तर,
आज कार्यकर्ते मिंधे आहेत.
कार्यकर्त्यांच्या मिंधेपणावरच,
सगळे राजकीय धंदे आहेत.
कार्यकर्त्यांचा मिंधेपणा,
हीच निष्ठेची पहिली अट आहे !
बाणेदारपणा मिरवाल तर,
आपलता नेतृत्वाशी गाठ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7538
दैनिक झुंजार नेता
3मार्च2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...