Showing posts with label डीजे. Show all posts
Showing posts with label डीजे. Show all posts

Friday, September 4, 2026

डीजेचा पीजे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
डीजेचा पीजे
कुणी आपटला गेला आहे.
कुणी धोपटला गेला आहे.
सांगा तर्कसंगत विचार,
कुणाला बा पटला गेला आहे?
ज्याने कुणी गाय मारली आहे,
तो वासरू मारलेले दाखवतो आहे.
एक नकटा दुसऱ्या नकट्याला,
इथे शहाणपणा शिकवतो आहे.
कुणाला झोंबतील मिरच्या,
कुणाला वाटेल हा पीजे आहे!
गणपती बाप्पाच्या मुळावरती,
दरवर्षी पुन्हा पुन्हा डीजे आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9388
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 सप्टेंबर 2026

 

परंपरेच्या नावाने ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- परंपरेच्या नावाने विरोधाला विरोध करायचा म्हणून, काहीच नाकारले जाऊ शकत नाही. प्राचीन प्रथा आणि पर...